सेंट ल्युसिया :- वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने टी-20 क्रिकेटमध्ये 500 बळी मिळविण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा ब्राव्हो पहिलाच गोलंदाज ठरला.
कॅरेबियन प्रिमियर लीगच्या सामन्यात ब्राव्होने सेंट ल्युसिया झोक्सचा फलंदाज रहकीम कॉर्नवॉलला बाद करत ही कामगिरी केली. ब्राव्होने 549 टी-20 सामन्यात 500 बळींची नोंद केली. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा 390 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमासह कॅरेबियन लीगमध्ये 100 बळी देखील त्याने नोंदवले. ब्राव्हो 21 वेगवेगळ्या संघांकडून टी20 सामने खेळला आहे.