पुणे-नाशिक महामार्गावर पाच तास वाहतूक ठप्प

संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर आंबी खालसा शिवारात कंटेनरचा पुढील टायर फुटल्याने तो दुभाजकावर चढून महामार्गावर आडवा झाला. त्यामुळे सुमारे पाच तास महामार्गावरी वाहतूक ठप्प होती. काही काळानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडने वळविण्यात आली. ही घटना आज सकाळी आठ वाजलेच्या सुमारास घडली.

आंबीखालसा फाटा येथे आज सकाळी आठच्या सुमारास नाशिककडून पुण्याकडे जाणारा कंटेनर (क्र. एचआर- 55 टी- 4563) आंबी खालसा शिवारात आला असता, त्याच्या पुढील बाजूचा टायर फुटला. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजकावर चढल्याने तो महामार्गावर आडवा झाला. त्यामुळे तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळली. कंटेनरचा लांबलचक भाग महामार्गावर आडवा झाल्याने येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल पाच तासानंतर क्रेनने तो बाजूला काढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.