बॅडमिंटनमध्ये आता 11 गुणांचे पाच गेम

नवी दिल्ली  -बॅडमिंटन च्या खेळातील उत्सुक टाकून राहवी तसेच या खेळाकडे नवोदित खेळाडू, देशातील युवा पीढीही खेचली जावी यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) नियमावलीत बदल करणार आहे. इंडोनेशिया आणि मालदिव या दोन संघटनांनी केलेल्या शिफारशीनुसार आता नियमपुस्तिकेत बदल केले जाण्याची शक्‍यता आहे.

त्यानुसार सध्या 21 गुणांच्या तीन गेमच्या आराखड्यात बदल करण्यात येणार असून 11 गुणांचे पाच गेम होणार असल्याची शक्‍यता महासंघाने व्यक्‍त केली आहे. बॅडमिंटनचे सामने 21 गुणांचे खेळवले जातात. तीनपैकी दोन गेम जिंकणारा खेळाडू सामन्यात विजयी ठरत असे.

पण आता या खेळातील रंगत वाढवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रेक्षकांना या खेळाकडे वळवण्यासाठी 11 गुणांचे पाच गेम खेळवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 22 मे रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा नियम अमलात येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.