नगर – महापालिकेतील उद्यान विभागातील कर्मचारी कामात टाळाटाळ करतात. कामावर गैरहजर असणे, ठरावीक ठिकाणीच बदलीची मागणी करतात, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी सोमवारी (दि.16) रात्री उद्यान विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस व दोन महिला कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
द्विवेदी यांनी यापूर्वीही एकदा महापालिकेचा पदभार असताना उद्यान विभागाची झाडाझडती घेतली होती. द्विवेदी यांनी बोलाविलेल्या बैठकीला अनिल पुरणवाणे, नम्रता नवनाथ बडे, भाऊसाहेब रामभाऊ भोसले, नंदू गणपत ढोणे, राधाकिसन बन्सी कोतकर हे पाच कर्मचारी अनुपस्थित होते.