पणजी : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यात कडक लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्यापासून पाच दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. गोवा हे कर्नाटकनंतर दुसरे भाजपशासित राज्य आहे जिथे लॉकाडाऊन करण्यात आले आहे.
Lockdown announced in state from 29th April 7 pm to the morning of 3rd May. Essential services & industrial activities allowed, public transport to remain shut. Casinos, hotels, pubs remain closed. Borders to remain open for essential service transportation: Goa CM Pramod Sawant pic.twitter.com/PXaUfT5tkG
— ANI (@ANI) April 28, 2021
गोव्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद राहील. मात्र उद्योगधंदे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असेही आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
लोकांनी जर पुढचे पाच दिवस कडक लॉकडाऊनचे पालन केले तर संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. कॅसिनो, बार लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. तर रेस्टॉरंट फक्त पार्सल सुविधा देऊ शकतात. अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात येण्यास किंवा जाण्यासाठी बंदी नसेल असेही सांगण्यात आले आहे.