भोपाळ : भोपाळमध्ये करोनाच्या बाधेमुळे मरण पावलेले पाचही जण हे 1984 च्या वायू दूर्घटनेतील पीडित होते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले. भोपाळ गॅस दूर्घटनाग्रस्तांना करोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता पाच पट अधिक आहेत. त्यामुळे या लोकांची अधिक काळजी घ्यावी, असे निवेदन दूर्घटनाग्रस्तांच्या संघटनेने सरकारला 21 मार्चला दिले होते. मरण पावलेले पाचही जण हे भोपाळ गॅस दूर्घटनेशी संबंधित होते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.
भोपाळ दूर्घटना ग्रस्तांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेले रुग्णालय करोना बाधितांसाठी राखीव केले आहे. त्यामुळे या दूर्घटनाग्रस्तांच्या उपचारात अडथळे येत आहेत, असे भोपाळ ग्रुप फॉर इन्फरमेशन अँड ऍक्शनच्या सदस्या रचना धिंग्रा यांनी सांगितले.