भुज – सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गुजरातच्या सागरी हद्दी लगतच्या हरामी नाला खाडीत पाकिस्तानच्या पाच बोटी जप्त केल्या आहेत. या िंसंगल इंजीन बोटी ताब्यात घेण्यात आल्या त्याची चौकशी सुरू आहे.
या बोटी मच्छिमारासाठी वापरण्यात येत असल्याचे सकृत दर्शनी आढळून आले असले तरी सीमा सुरक्षा दल पाकिस्तानी बोटींच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. हरामी नाला हा सागरी भाग उथळ पाण्याचा आहे. तो सर खाडी लगतच आहे.
पाकिस्तानी सागरी हद्दीतून येथे येणे सहज शक्य असल्याचा अंदाज याद्वारे घेण्यात आला असावा असाही कयास लावला जात आहे. येथे या बोटी आणून तशाच सोडून दिल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने या भागात बोटी सोडून दिल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे.