सातारा – चोरट्यांनी शहरातील बुधवार पेठेत शनिवारी मध्यरात्री धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा रविवारी रात्री मार्केड यार्ड परिसरात पाच घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील मध्यवस्तीत झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची फिर्याद अनिरूध्द जयराज देवदारे (रा. गुरूवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. सलग दोन दिवस घरफोड्या करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री मार्केड यार्ड परिसरातील पाच किराणा दुकाने फोडून एक लाख 43 हजारांची रोख रक्कम लांबविली. शनिवारी रात्री चोरट्यांनी बुधवार पेठेतील अमीन ट्रेडर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी 15 हजारांची चिल्लर चोरून नेली. याच परिसरातील अस्लम शेख यांच्या घरामधून कपडे, बॅगा व इतर साहित्य चोरट्यांनी लांबविले. जरिना शेख, मुसा शेख यांचे घर चोरट्यांनी फोडले. मात्र, त्यांच्या हाती फारसे काही हाती लागले नव्हते. मात्र, रविवारी चोरट्यांनी पुन्हा मार्केड यार्ड परिसरातील किराणा दुकाने लक्ष्य करून एकाच रात्री पाच दुकानांची शटर