दरोड्याच्या तयारीतील 5 आरोपी जेरबंद

नगर – केडगाव परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र टकले यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार केडगाव बायपास परिसरातील हॉटेल परिवर्तन लगत गस्त घालत असताना आरोपी दत्ता मुंजाजी लंघे (वय-20, रा. शिदोरा, ता. वसमत, जि. हिंगोली), निवृत्ती शंकर वानुके (वय- 20, रा. तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली), प्रदीप शिवचरण पारवे (वय-20, रा. गोटपुराणा, जि. परभणी), मारुती बालाजी शिंदे (वय-22, रा. परभणी), गणेश भाऊराव जोगदंड (वय-20, ता. पूर्णा, जि. परभणी) आदींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन मिरची पावडर, सत्तुर, कोयता, चाकू, विळा, दगड आदी साहित्य ताब्यात घेतले. या कारवाईत रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिदे, सुमित गवळी, अविनाश बर्डी यांनी सापळा रचून पाच जण ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.