समीरा रेड्डीला काही दिवसांपूर्वी करोनाचा संसार कसा झाला होता. आता ती बरी होते आहे. तिने सोशल मीडियावर स्वतःचा आणि दोन्ही मुलांबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
हे तिघेही एका बागेमध्ये नाचत बागडत असल्याचे दिसते आहे. तिचा उत्साह लहान मुलांसारखाच आहे. तिच्याबरोबर तिची लहान मुलेही मस्त खेळत आहेत.
View this post on Instagram
आपल्या मुलांना कसे बिझी ठेवायचे याचे मार्गदर्शनच तिने या व्हिडिओमधून केले आहे. करोनामधून बरी झाल्यावर आठवड्याभराने थोडाफार व्यायाम आणि योगा अभ्यास करायला लागल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या मुलांनाही व्यायामाची आवड लागावी, यासाठी त्यांना तशी सवय लावणे गरजेचे आहे असे ती म्हणाली.
View this post on Instagram
आपल्या फिटनेससाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे, हेच तिला या व्हिडिओतून सांगायचे होते. करोना च्या संकटात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी फिटनेस आवश्यक असल्याचे तिने पुन्हा एकदा नमूद केले आहे.
View this post on Instagram