आता घरबसल्या मिळणार शिल्पा शेट्टीकडून ‘फिटनेसचे’ धडे

वयाची चाळीशी पार केल्यानंतर देखील एखाद्या विशीतील तरुणीला लाजवेल अशी फिगर मेन्टेन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच एक्सर्साईजचे महत्व सांगताना दिसते. मध्यंतरी शिल्पाने आपला पती राज कुंद्रा याला देखील फिटनेससाठी मोटिव्हेट करत त्याच्यासोबत स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतानाच व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. दरम्यान, आता शिल्पा शेट्टीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज असून पती राज कुंद्रा प्रमाणेच शिल्पा तुम्हाला देखील व्यायामासाठी मोटिव्हेट करणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिल्पा शेट्टी ही एक फिटनेस ऍप लॉंच करणार असून हे ऍप आयफोन वापरकर्त्यांसाठी आजपासून तर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ८ जूनपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ऍप बाबत बोलताना शिल्पाने सांगितले की, “माझ्या फिटनेसबाबत अनेक लोक मला विचारत असतात यातून एक गोष्ट जाणवली की लोकांना फिटनेसबाबत माहिती उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यामुळेच मी हे ऍप लाँच करण्याचा निर्णय घेतला असून या ऍपद्वारे मी माझे अनुभव शेअर करणार आहे. या ऍपद्वारे माझ्याबरोबरच अनेक फिटनेस एक्सपर्ट्सचे देखील मार्गदर्शन अनेकांना मिळणार आहे. या ऍपचा वापर करून जिमचे पैसे न मोजता तुम्ही घरच्या घरी आपला फिटनेस सांभाळू शकणार आहात.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.