पुणे – थंडीमुळे खोल समुद्रातील मासळीची आवक घटली आहे. तर, 31 डिसेंबर रोजी सर्वत्र पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे मासळीला मागणी वाढली आहे. त्यामुळे समुद्रातील मासळीचे भाव 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित मासळीचे भाव स्थिर आहेत.
चिकनची मागणी कमी झाल्याने घाऊक भावात किलोमागे 10 रुपयांनी घट झाली. तर, केकसाठी मागणी वाढल्याने गावरान आणि इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे अनुक्रमे 10, 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. 27) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 1 ते 1.5 टन आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 16 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : 1200 मोठे 1200, मध्यम : 900-1000, लहान 600- 700, भिला : 500-550, हलवा : 400-440, सुरमई : 360-440, रावस : लहान 480, मोठा : कट 750, घोळ : 600, भिंग : 360, करली : 280, करंदी : सोललेली 480, पाला : लहान 700, मोठे : 1200-1400, वाम : मोठी 750, ओले बोंबील : 160, कोळंबी ः लहान 240, मध्यम 360-400, मोठे 550, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1000, मोरी : 280, मांदेली : 100, राणीमासा : 160, खेकड : 280, चिंबोऱ्या : 480. खाडीची मासळी : सौंदाळे : 340, खापी : 240, नगली : लहान 280, मोठी 700, तांबोशी : 400, पालू : 280, लेपा : लहान 120, मोठे 240, शेवटे : 200-240 बांगडा : लहान 200, मोठे 240, पेडवी : 100, बेळुंजी : 140, तिसऱ्या : 240, खुबे : 140, तारली : 180, नदीची मासळी : रहू : 160 कतला : 180, मरळ : 440, शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी :160, खेकडे : 240 वाम : 500. चिकन : चिकन : 180, लेगपीस : 220 जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 280. अंडी : गावरान : शेकडा : 870 डझन : 120 प्रति नग : 10, इंग्लिश : शेकडा : 565 डझन : 72 प्रतिनग : 6 मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.