नवी दिल्ली – सन 2021-22 या आर्थिक वर्षातील एकूण वित्तीय तूट जीडीपीच्या 6.71 टक्के इतकी नोंदवली गेली आहे अशी माहिती लेखा नियंत्रकांकडून आज जाहीर करण्यात आली.
सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये वित्त मंत्रालयाने ही तूट 6.9 टक्के इतकी राहील, असे अनुमान वर्तवण्यात आले होते. पण त्या अनुमानापेक्षा ही तूट कमी आहे. रकमेच्या भाषेत बोलायचे तर ही तूट 15 लाख 86 हजार 537 कोटी रुपये इतकी आहे. 2021-22 च्या अखेरीस महसुली तूट 4.37 टक्के इतकी होती.
चालू आर्थिक वर्षात म्हणजे सन 2022-23 या वर्षात ही वित्तीय तूट 6.9 टक्के इतकी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या प्रमाणात 3.5 टक्के इतकीच असावी असे आर्थिक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु सरकारला त्या पातळीपर्यंत ही तूट कायम ठेवता आलेली नाही, असे यातून समोर आले आहे.