नवी दिल्ली – राहुल गांधी आता माजी खासदार झाले आहेत. राहुल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. गुजरातच्या सुरत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली. यामुळेच राहुल यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली.
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी नेमकं त्यावेळी पहा VIDEO
Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha.#RahulGandhi pic.twitter.com/ghNC1mWRGu
— Ajay Sehrawat (@IamAjaySehrawat) March 24, 2023