पुण्याला प्रथमच यजमानपद

पुणे: अखिल भारतीय कॅरम महासंघ आणि आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघ यांच्या मान्यतेने राष्ट्रीय महासंघ चषक कॅरम स्पर्धेचे येत्या 2 ते 6 डिसेंबर कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष असून पुण्यात प्रथमच ही स्पर्धा होत आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा होणार असून यात जवळपास 18 देशांच्या संघातून जवळपास शंभरपेक्षाही जास्त खेळाडु सहभागी होत आहेत. आतापर्यंत 16 देशांनी सहभाग निश्‍चित केला आहे. 2016 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रशांत मोरे आणि एस. अपूर्वा यांचा समावेश असलेल्या भारतीय संघ या स्पर्धेत वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा आहे.

राजेश गोहील, रश्‍मी कुमारी यांच्याकडूनही सरस कामगिरीची अपेक्षा आहे. महाराष्ट्र व पुणे कॅरम संघटना यजमानपद भुषवत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष भारत देसडला, सचिव यतीन ठाकूर, स्पर्धा सचिव अरुण केदार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रीय पंच अजित सावंत स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून काम पाहणार आहेत. तसेच आयोजन सचिव म्हणून भारती नारायण तर, स्पर्धा संचालक म्हणून व्ही. डी. नारायण काम पाहतील. संघटनेच्या यु ट्युब चॅनलवरून स्पर्धेतील सामन्यांचे प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. सामन्यांचे समालोचनही केले जाणार आहे. पत्रकार परिषदेत
स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात आले. प्रेक्षकांसाठी खास आसनव्यवस्था तसेच स्क्रिनवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.