#CWC19 : भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरी सामना, ही आहेत दोन्ही संघांची बलस्थाने

मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेत सातत्याने भक्कम पाया रचणारी भारतीय संघाची फलंदाजाची पहिली फळी न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक माऱ्यास कशी सामोरी जाते यावरच त्यांचे उपांत्य फेरीतील लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. भारताच्या संमिश्र माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज किती टिकतात याचीच उत्सुकता आजच्या सामन्याबाबत निर्माण झाली आहे.

दोन्ही संघाकडे स्वत:ची अशी बलस्थाने आहेत. त्या बलस्थानाच्या जोरावर दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करतील.

भारत बलस्थाने-

* पहिल्या फळीत भक्कम फलंदाजी
* रोहित शर्मा व लोकेश राहुल यांची सातत्यपूर्ण कामगिरी
* कर्णधार विराट कोहलीही “फॉर्ममध्ये)
* जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची प्रभावी कामगिरी

कच्चे दुवे-

* मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश
* महेंद्रसिंग धोनी याच्या खेळात क्रमकतेचा अभाव
* शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत धावांचा वेग वाढविण्यात अपयश
* धावा रोखण्याबाबत फिरकी गोलंदाज अपयशी

न्यूझीलंड बलस्थाने

* आक्रमक फलंदाज कर्णधार केन विल्यमसनचा सातत्यपूर्ण खेळ
* लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्‍री यांचा भेदक मारा. तसेच जेम्स नीशाम व कॉलीन डीग्रॅंडहोम यांचीही त्यांना मोलाची साथ
* फिरकी गोलंदाज मिचेल सॅंटनर याची किफायतशीर गोलंदाजी

कच्चे दुवे-

* प्रतिस्पर्धी फलंदाजांवर शेवटपर्यंत अंकुश ठेवण्यात अडचण
* विल्यमसनचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव
* फिरकी गोलंदाजांपुढे खेळताना समस्या
* क्षेत्ररक्षणात होणाऱ्या चुकांवर नियंत्रण नाही

Leave A Reply

Your email address will not be published.