तळेगाव स्टेशन :समूहगान स्पर्धेत शहरी विभागात सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभागाने प्रथम क्रमांक पटकावला.
तळेगाव स्टेशन (वार्ताहर) – येथील रोटरीच्या क्लब ऑफ तळेगाव दाभाडे एमआयडीसी व मावळ नागरी पतसंस्था आयोजित तालुकास्तरीय समूहगान स्पर्धेत शहरी विभागात सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभागाचा प्रथम क्रमांक आला.
समूहगीत कल्याणी जोशी यांनी मार्गदर्शन केले. संगीत साथ प्रवीण ढवळे, निरंजन थिटे, राजहंस यांनी दिली.
रजनीगंधा खांडगे, अस्मिता कोळवनकर, शबनम खान, मिलिंद शेलार, शंकर हदीमनी यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम शाळेस पारितोषिक मिळाले. मुख्याध्यापिका रेखा परदेशी व संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, कार्यवाह प्रमोद देशक यांनी विजेत्यांचे कौतुक केले.