‘बबली’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित..

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत वेगवेगळे विषय हाताळले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये विविध विषयांवर आधारित आशयघन चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येत आहेत. अशाच पठडीतला एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बबली’ असं या चित्रपटाचे नाव आहे. भावनिक कथेला मनोरंजनाची झालर असलेल्या या चित्रपटाचे पहिलं पोस्टरही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

रॉबर्ट मेघा दिग्दर्शित या चित्रपटात एका गोड मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. त्या व्यक्तिरेखेचा प्रवास लहानपणापासून ते तिच्या तारुण्यातील लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्यापर्यंतचा आहे. सर्व पालक आपल्या मुलांना कुठल्यातरी टोपण नावाने बोलावत असतात. पुढे मोठे झाल्यावर ही टोपण नाव, हवी-नको असली तरी, चिकटूनच राहतात. आता मराठीमध्येही ‘बबली’ हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे.

अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रफलकाचं अनावरण करण्यात आलं आहे. यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी टॅगलाईन असलेला ‘बबली’ हा चित्रपट त्याच्या कथानकाबद्दल बरच काही सांगून जातो. तरीही यातील वळणं प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतील, अशी शक्यता असल्याचं दिग्दर्शकांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.