मुंबई – अभिनेत्री सई ताम्हणकरने अमेय वाघसोबत गर्लफ्रेंड चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात सई प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Sai Tamhankar, Rajesh Shringarpure and Nikhil Ratnaparkhi… First look poster of #Marathi film #KulkarniChowkatalaDeshpande… Directed by Gajendra Ahire… Produced by Smita Film Production… 22 Nov 2019 release. pic.twitter.com/lhwRj63jn7
— taran adarsh (@taran_adarsh) September 29, 2019
‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत राजेश श्रृंगारपूरे आणि निखिल रत्नपारखी हे देखील भूमिका साकारत आहेत.स्मिता प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. विनय गनू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.