पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण अफ्रीकेचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय

डंबुला: गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी नंतर फलंदाजांच्या कामगीरीमुळे दक्षिण अफ्रीकेने श्रीलंकेचा पाच गडी आणि 114 चेंडू राखुन पराभव करताना येथे होत असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एकतर्फी आपल्या नावे करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ 34.3 षटकांत सर्वबाद 193 धावांवर संपुष्टात आला, त्यामुळे केवळ 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रीकेने 31 षटकांत 5 बाद 196 धावा करताना सामना एकतर्फी आपल्या नावे केला. यावेळी 194 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या अफ्रीकेचा सलामीवीर हाशिम आमला केवळ 19 धावा करुन बाद झाला. तर एडन मर्क्रम देखिल लागलीच परतल्याने अफ्रीकेची 2 बाद 31 अशी छोटीशी घसरगुंडी उडाली होती. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि कर्नधार फाफ ड्यु प्लेसीस यांनी संघाचा दाव सावरताना संघाला शतकीय वेस ओलांडून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संघाच्या 113 धावा झाल्या असताना डि कॉक 47 धावांवर असताना बाद झाला. तर लागलीच कर्णधार ड्यु प्लेसिस देखिल 47 धावा काढुन परतल्याने संघाची घसरगुंडी ऊडाली. मात्र जे.पी ड्युमीनी ने एकबाजुने किल्ला लढवताना अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यांचा निम्मा संघ केवळ 35 धावांवरच पव्हिलीयन मध्ये परतला होता. त्यानंतर कुसल परेरा आणि थिसारा परेरा यांनी संघाचा डाव सावरताना 8.5 षटकांत 92 धावांची वेगवान भागीदारी नोंदवत संघाला शंभरी पार करुन दिली. यावेळी 49 धावांवर असताना थिसारा परेराला बाद करत शम्सीने श्रीलंकेला आणखीन एक मोठा धक्‍का दिला. तर कुसल परेराने एकाबाजुने फटकेबाजी करताना 72 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 81 धावांची खेळी करत संघाला 193 धावांपर्यंत मजल मारून दिली. यावेळी दक्षिण अफ्रीकेच्या कागिसो रबाडाने 41 धावा देताना 4 गडी बाद केले तर तबरेझ शम्सीने 33 धावा देत 4 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)