मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यन, आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर, अनन्या पांडे यांच्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात कार्तिक एका मध्यमवर्गीय गृहस्थाची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये तसा त्याचा लूकही दिसून येतोय. कानपूरवासी पिंटू त्यागी अस त्याच्या व्यक्तिरेखेेच नाव आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
Kartik Aaryan as #ChintuTyagi from #PatiPatniAurWoh… Costars Bhumi Pednekar and Ananya Panday… Directed by Mudassar Aziz… 6 Dec 2019 release. pic.twitter.com/Xrb391592M
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2019
दरम्यान भूमी पेडणेकरचा ही लूक समोर आला आहे. यामध्ये भूमी पत्नीचा रोल करताना दिसणार आहे.
1978मध्ये आलेल्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. मुदस्सर अजीज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Meet the Patni… Bhumi Pednekar in the new character poster of #PatiPatniAurWoh… Costars Kartik Aaryan and Ananya Panday… Directed by Mudassar Aziz… 6 Dec 2019 release. pic.twitter.com/prBWCqmNIS
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2019