मुंबई – ‘मर्दानी’ चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातही राणी पोलिसाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये राणीची दमदार झलक पाहायला मिळत आहे.
#Mardaani2 teaser trailer is here… Stars Rani Mukerji… Directed by Gopi Puthran… Produced by Aditya Chopra… 13 Dec 2019 release… #SheWontStop #Mardaani2Teaser: https://t.co/pM4bf9GUPQ
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी याचा टीझरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केले असून आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. टीझरसोबतच ‘मर्दानी २’ चित्रपटाचं फर्स्ट पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. यामध्ये राणीचा करारी लूक पाहायला मिळतो.
And here’s the first look poster of #Mardaani2… Stars Rani Mukerji… Directed by Gopi Puthran… Produced by Aditya Chopra… 13 Dec 2019 release. pic.twitter.com/B6KBO2ktPH
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019
अवघ्या ३८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये राणीची दमदार भूमिका पाहायला मिळते. ‘गुन्हेगार जोपर्यंत गुन्हा करण थांबवत नाहीत, तोपर्यंत मर्दानी थांबणार नाही’, अशा ओळी या टीझरमध्ये पहायला मिळतात. महिलांवरील अत्याचारावर हा चित्रपट भाष्य करणार आहे.