मुंबई – बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर ६ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, ‘मलंग’ चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आदित्य आणि दिशा पटानी यांचा हटके अंदाज दिसून येत आहे. हा चित्रपट एका सुंदर लोव्हस्टोरी वर आधारित असणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार, चित्रपटात आदित्य अफलातून जबरदस्त अॅक्शन सीन आणि स्टंट करताना दिसणार आहे.