पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत पुणे जिल्ह्यातून अपेक्षेप्रमाणे अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, यांना उमेदवारी देण्यात आली. हडपसर मधून चेतन तुपे यांना तर खडकवासल्यातून सचिन दोडके आणि पर्वतीतून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.छगन भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी दिली आहे. एकूण ७७ उमेदवर पहिल्या यादीत असून काल अर्ज भारलेल्या जयंत पाटलांचाही यात समावेश आहे.
वडगावशेरी मधून सुनील टिंगरे याना उमेदवारी देण्यात आली. जुन्नर मधून अतुल बेरके यांना तर दौंड मधून रमेश थोरात यांना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले आहे. नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केज मध्ये पृथ्वीराज साठे याना उमेदवारी दिली असून परळीतून धनंजय मुंढे याना रिंगणात उतरविले आहे. श्रीवर्धन मधून अदिती तटकरे यांना मैदानात उतरून शिवबंधन बांधणाऱ्या अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीने शह दिला आहे.
पंढरपूरमध्ये काँग्रेसचे भारत भालके याना उमेदवारी देऊन परिचारक गटाला शह दिला आहे. कोकणात राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या भास्कर कदम यांच्या विरोधात चिपळूण मध्ये शेखर निकम याना मैदानात उतरवले आहे.
तासगाव मध्ये आर.आर.पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमन पाटील यांना मैदानात उतरविले आहे.