नगरमध्ये शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचा निर्यण काल जाहीर केल्यांनतर आज अहमदनगर जिल्यातील पहिली कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली. नगर तालुक्यातील जखणगाव आणि  राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या दोन गावांची यादी प्रसिद्ध करण्यात  आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफीचा निर्णय घेतला होता. कोणत्याही कागदपत्र विना दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील पहिली यादी आज प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली. यामध्ये जखणगाव 116 आणि ब्राह्मणी गावात 856 असे एकूण 972 नावाची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. नगर जिल्ह्यातील 21,5000 शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.