मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आघाडी बाबत सगळ्यांनाच प्रतीक्षा होती. आता आघाडीचा १२५-१२५ जागांचा फॉर्मुला ठरला असून. मित्र पक्षाला ३८ जागा सोडणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल आहे. त्यानंतर काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये ५१ उमेदवारांचे नवे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात अली आहे.
The Congress Central Election Committee announces the first list of candidates for the ensuing elections to the Legislative Assembly of Maharashtra pic.twitter.com/LUruU7UNWB
— Congress (@INCIndia) September 29, 2019
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह २० विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.