‘सीएस’च्या परीक्षेत पुण्याची कल्याणी पुंडलिक देशात प्रथम

पुणे – द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज्‌ ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या “कंपनी सेक्रेटरिज्‌ (सीएस) फाउंडेशन प्रोग्रॅम’ या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात पुण्यातील कल्याणी पुंडलिक ही विद्यार्थिनी देशात प्रथम क्रमांक मिळविला. सीएस फाउंडेशन प्रोग्रॅमचा एकूण निकाल 62.11 टक्‍के इतका लागला आहे.

सीए फाउंडेशनचा निकाल आज सकाळी अकरा वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. ही परीक्षा देशभरात दि. 29 व 30 डिसेंबर रोजी देशातील 128 केंद्रावर घेण्यात आली होती. त्यात एक केंद्र दुबई येथे होते. हा निकाल www.icsi.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीएस फाउंडेशन परीक्षेत पुण्यातील कल्याणी अश्‍विन पुंडलिक हिने देशात ऑल इंडिया फस्ट रॅंक मिळविला आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या ह्या परीक्षेत 62.11 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, पुढची सीए फाउंडेशन प्रोग्रॅम ही परीक्षा येत्या 8 व 9 जून 2019 रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीएसच्या एक्‍झिक्‍युटिव्ह व प्रोफेशनल परीक्षेचा निकाल दि. 25 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुपारी 2 व सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. या परीक्षा डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आल्या आहेत. “आयसीएसआय’च्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.