हज यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना 

मुंबई: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेसाठी निघालेल्या भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली. कोणत्याही अनुदानाशिवाय हज यात्रा होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान पूर्णपणे बंद तर विमान तिकिटांसाठीचे अनुदान ५७ कोटींनी कमी करण्यात आले असले तरी यावर्षी १,२८,७०२ यात्रेकरू भारतीय हज कमिटीद्वारे हज यात्रेसाठी जाणार आहेत. यावर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये ४७% महिला यात्रेकरूंचा समावेश असून १३०८ महिला ‘मेहरम’ म्हणजेच पुरुष साथीदाराशिवाय जाणार आहेत” अशी माहिती त्यांनी दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)