मुंबई – बुधवारी मुंबई शेअर बाजारात लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बॉन्डचं लिस्टिंग करण्यात आलं. या बॉन्डच्या माध्यमातून जमवण्यात येणारी रक्कम लखनौमध्ये पायाभूत सुविधांच्या कामावर खर्च करण्यात येणार आहे. नुकतेच लखनौ महापालिकेनं सुशोभिकरण, साफसफाई आणि अन्य कामांसाठी 200 कोटी रूपयांचे बॉन्ड्स जारी केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही त्याला 225 टक्के सबस्क्रीप्शन मिळालं. हाच बॉन्ड बुधवारी मुंबई शेअर बाजारात लिस्ट करण्यात आला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लिस्टिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशला समृद्ध बनवणं हे एकच ध्येय आहे, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं. अशा प्रकारे लखनौ महापालिका ही बॉन्ड जारी करणारी देशातली पहिली महापालिका बनली आहे.