मुंबई : राज्यतील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे म्हणत असतानाच आता विदर्भातील चंद्रपूरमध्ये पहिल्या कोरोना बाधिताची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रपुरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे, तर महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही आता ३ हजार ८१ इतकी झाली आहे. १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही ३ हजारांच्यावर गेली आहे. १६५ रुग्णांपैकी १०७ रुग्ण हे मुंबईत आहेत.
चंद्रपुरात आत्तापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज समोर आलेल्या यादीनुसार चंद्रपुरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.