जीवघेण्या कोरोनावरील पहिली लस पुण्यात विकसित

पुणे – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मृतांच्या संख्येत पण भर पडत आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, जीवघेण्या कोरोना व्हायरसवर आता पुण्यात लस विकसित करण्यात आली आहे.

पुण्यातील  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने ही लस विकसित केली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी ही लस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करण्यात आली आहे. सहा महिन्यांनतर रुग्णावर या लसीची चाचणी केली जाणार आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखता येऊ शकेल. ही भारतातील पहिली लस असेल, असे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

दरम्यान, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या भरमसाठ उपाय योजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. चीनबाहेर या आजाराचा प्रादुर्भाव अत्यल्प असून, सार्स किंवा मर्ससारख्या इतर कोरोना विषाणूजन्य आजारांच्या तुलनेत कोविड-19 हा आजार कमी घातक आहे, असे संघटनेनं म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.