First Cabinet meeting । तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकारची स्थापना केली आहे. त्यांच्या शपथविधीचा सोहळा काल राष्ट्रपती भवनात पार पडला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान ,शपथविधीनंतर आजएनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक First Cabinet meeting ।
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज संध्याकाळी ५ वाजता नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते, असे सांगण्यात येत आहे.
The first Cabinet meeting of the newly inducted NDA government is likely to be held at 5 pm tomorrow
— ANI (@ANI) June 9, 2024
दरम्यान, कुमारस्वामी, शिवराजसिंह चौहान, खट्टर, सर्बानंद सोनोवाल, मांझी आणि राजनाथ सिंह या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारमध्ये नवी भूमिका स्वीकाली आहे. तर मागच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर आणि राजीव चंद्रशेखर या महत्त्वाच्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे.
सर्वसामावेशक नेत्यांचे मंत्रिमंडळ First Cabinet meeting ।
नव्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी, १० दलित, ५ आदिवासी, ५ अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश आहे. अश्विनी वैष्णव, हरदीपसिंह पुरी, जयशंकर, कुरियन, सीतारामन हे राज्यसभेतील खासदार मंत्री असून पंजाबमधील रवनीतसिंह बिट्टू आणि तमिळनाडूतील एम. मुरुगन यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही केंद्र सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होणार असून पहिल्याच बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा, कोणते निर्णय घेतले जातात हे पाहावं लागणार आहे.