“आधी बिहार मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा आणा मग आम्ही विचार करू”

- शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपला सुचना

मुंबई – भारतीय जनता पक्षाने आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बिहार मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा करायला सांगावा. त्यांनी तो मान्य केला तर असा कायदा महाराष्ट्रात करण्याविषयी आम्ही विचार करू असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागणीवर वरील प्रतिक्रीया दिली.

पश्‍चिम बंगालमध्ये येत्या काही काळात विधानसभेची निवडणूक होत आहे त्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून हा प्रकार सुरू असावा असा आरोपी राऊत यांनी केला. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार मध्ये हे कायदे संमत केल्यानंतर आम्ही त्यांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आज देशात बेरोजगारी, महागाई आणि अन्य आर्थिक मंदीचे प्रश्‍न आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्यांनी लव्ह जिहाद सारखे विषय उपस्थित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.