– सागर येवले
पुणे – अतिदक्षता विभागातील करोना बाधितावर “प्लाझ्मा थेरपी’ करण्यासाठी ससून रुग्णालय सज्ज झाले आहे. या थेरपीसाठी आवश्यक त्या सर्व परवानगी मिळाल्या असून, पुण्यात करोना आजारातून मुक्त झालेल्या एका व्यक्तीने त्यासाठी रक्तदान केले आहे. पुण्यातील ही पहिली प्लाझ्मा थेरपी असून, ससून रुग्णालयात कोणत्या बाधितावर ही थेरपी करायची याचा निर्णय घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांत ही थेरपी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचे उपचार ससूनमध्ये प्लाझ्मासाठी पहिले रक्तदान
उपयोगी ठरतील का, हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयात हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तसेच केंद्रीय औषध महानियंत्रकांनीदेखील रक्तातील प्लाझ्माचे घटक वेगळे करण्यासाठी (प्लाझ्मा फोरेसिस) परवानगी दिली होती. दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरचीही परवानगी मिळाली असून, ज्या दात्याकडून प्लाझ्मा घटक घ्यायचे आहे, त्याचा विमा उतरवा लागतो. ती प्रक्रियाही आता पूर्ण झाल्याची अधिकृत माहिती ससून प्रशासनाकडून देण्यात आली.
ससूनमध्ये प्रायेगिक तत्त्वावर प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी मिळाली आहे. एका व्यक्तीचे रक्तसंकलन केले असून लवकरच करोना रुग्णावर त्याद्वारे उपचार सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे