नांदेड – नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. गोळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे माजी शहराध्यक्षाचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/7r2Ni6OJiP
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 12, 2021
सोनू कल्याणकर असे भाजपा युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षाचे नाव आहे. श्रीनगर भागात सोनू रहावयास असून तो आपल्या घराच्या गेटजवळ बसला होता. रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्याच्या घरासमोर आले. त्यापैकी दोघांनी सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू घरामध्ये पळाला त्यामुळे त्याचा जीव वाचला.
दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.