रिओ डी जनेइरो : लष्करी पोलिसांनी वाढीव पगाराच्या मागणीसाठी केलेल्या संपामध्ये मध्यस्थी करण्यास पुढे झालेल्या खासदारावर गोळीबार करण्यात आला आहे. सिड गोम्स असे या खासदाराचे नाव असून ते माजी राज्यपाल होते. छातीत गोळी लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गोम्स यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय मदतीशिवाय त्यांना श्वासोच्छवास करता येत आहे, असे रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संपकर्त्या पोलिसांशी चर्चा करण्यासाठी गोम्स अडथळे ओलांडून गेले. मात्र त्यांच्या वाहनाच्या खिडकीच्या काचेवर गोली झाडली गेल्याचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाला. मात्र गोळीबार करणाऱ्याने कोठून गोळी झाडली, हे त्वरित समजू शकले नाही.
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला जाण्यापूर्वी गोम्स यांनी ट्विटरवरच्या व्हिडीओ पोस्टमध्ये पोलिसांच्या संपाबाबत संताप व्यक्त केला आणि हा संप समाप्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. पोलिसांनी ताबडतोब संप संपवावा. पोलिसांना संपाचा अधिकार नाही, असे गोम्स यांनी जमावातील पोलिसांनी खडसावताच दोन गोळ्या झाडल्या गेल्या.