नवी दिल्ली – भररस्त्यात गोळ्या घालून व्यावसायिकाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवी दिल्लीत हा प्रकार घडला असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1301194596962290
अपूर्व जैन, वय 32 असे व्यावसायिकाचे नाव आहे. जखमी व्यावसायिकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नारायणा भागात अपूर्व यांचा प्लास्टिकचा व्यवसाय आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
आरोपींने अपुर्व यांच्या तीन गोळ्या झाडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यामध्ये मागून येऊन एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.