अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार : 1 ठार तर अनेक जण गंभीर जखमी

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन (डीसी)मध्ये एका अज्ञात व्यक्‍तिकडुन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अनेक जणांना गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे, त्याशिवाय पाच लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान व्हाईट हाऊसपासून थोड्या अंतरावर एका अज्ञात व्यक्‍तीकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार झाला ते ठिकाणी आणि परिसर पूर्णपणे सार्वजनिक वाहतूकीस बंद करण्यात आला असून पोलिस अद्याप हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. वॉशिंग्टनच्या उत्तर पश्‍चिमेकडील कोलंबिया रोडवर ही घटना घडल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान गोळीबार करण्यात आला ते ठिकाण राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)