संघ नेत्यावर जम्मू काश्मीर मध्ये गोळीबार ; दहशतवाद्यांचा हॉस्पिटल मध्ये हल्ला

श्रीनगर – जम्मू-काश्मीर राज्यातील किश्तवार जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी एका हॉस्पिटल मध्ये हल्ला केला आहे. या हल्ल्यात मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. तर चंद्रकांत शर्मा यांचा बॉडीगार्ड या हल्ल्यात ठार झाला आहे.

आज दुपारी बुरखा परिधान करून काही दहशतवादी हॉस्पिटलमध्ये घुसले. आणि त्यांनी चंद्रकांत शर्मा यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर बॉडीगार्डकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारानंतर परिसरात संचारबंदी लागू केली असून, पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.