हॉंगकॉंग : हॉंगकॉंगमधील पोलिसांनी पहिल्यांदाच थेट निषेध करणाऱ्या विरोधकांवर गोळीबार केला, अशी माहिती लोकशाही समर्थक दोन सदस्यांनी दिली. चीनच्या केंद्र सरकारने कम्युनिस्ट शासनाची 70 वर्षे साजरी करण्यासाठी विशाल लष्करी परेड काढली. त्याच दिवशी शहरात महिन्याभर सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला.
बीजिंगच्या उत्सवांना उधळण्याच्या प्रयत्नात हॉंगकॉंगमधील निदर्शकांनी वर्धापन दिन निवडला. निदर्शक आणि दंगल पोलिस यांच्यात आज जोरदार चकमकी झाल्या. बीजिंगमधील ही हिंसा, अश्रुधुर आणि रस्त्यावरील जाळपोळ जगासमोर आणली जाईल, अशी चीनला अपेक्षा नव्हती. उत्तर हॉंगकॉंगच्या सुएन वॅन जिल्ह्यात झालेल्या चकमकीच्या वेळी निषेध करणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. मंगळवारी शहरभर पोलिसांसोबत झालेल्या हिंसक चकमकींपैकी एका चकमकीत गोळी घातली गेलेल्या त्या माणसाची अवस्था त्वरित कळली नव्हती, असे जेम्स टू आणि औ नोक-हिन यांनी सांगितले.