लक्ष्मीपूजन दिनी पुण्यात 19 ठिकाणी आगीच्या घटना

पुणे – लक्ष्मी पूजनाच्या रात्री उशिरापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांत 19 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या घटना किरकोळ स्वरुपाच्या होत्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

 

लक्ष्मी पूजनानंतर आतषबाजी करण्यात आली. यामुळे छतावर साठलेला कचरा, टाकाऊ वस्तूंनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या. गुरुवार पेठेतील फुलवाला चौक, सिंहगड रस्ता सनसिटी परिसरातील घरात आग लागल्याची घटना घडली. पौड रस्त्यावरील बाबाज गार्डन हॉटेल, फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीतील गच्चीवर साठलेल्या कचऱ्याला आग लागली. येरवड्यातील गणेशनगर परिसरात कचऱ्याला आग लागली.

 

या घटनांमुळे मध्यरात्रीपर्यंत अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाणत होता. वेगवेगळ्या भागात लागलेली आग आटोक्यात आणताना जवानांची धावपळ झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.