फ्रान्समधील अतिविशाल चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी

पॅरिस (फ्रान्स) – पॅरिसमधील अतिप्राचीन नोट्रे देम हे चर्च आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे 12 तास अथक प्रयत्न केल्यानंतर या चर्चला लागलेली आग विझवण्यात फायर फायटर्सना यश आले. या आगीमुळे चर्चच्या भिंतीच केवळ शिल्लक राहिल्या. चर्चचे छत आणि माळा पूर्णपणे जळून गेला. या आगीमुळे चर्चचा विशाल घटेचा टॉवर मात्र थोडक्‍यात बचावला.

व्हिक्‍टर हुगो यांनी 1831 साली “हंचब्लॅक ऑफ नोट्रे देम’ या कादंबरीमध्ये या चर्चच्या संदर्भाने उल्लेख केला आहे. 900 वर्षांपूर्वीचा वारसा असलेल्या या चर्चला फ्रान्समधील इतिहासांचाही संदर्भ आहे. इतक्‍या पुरातन वास्तूचे नुतनीकरण सुरू झाले होते. कॅथोलिक इस्टर वीकपासून हे नुतनीकरण सुरू झाले होते.

या आगीमुळे कॅथेड्रलच्या संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आता या इमारतीच्या मजबूतीचे परीक्षण केले जाणार आहे. या चर्चला लागलेली आग एक अपघात सावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. नुइतनीकरणाच्या कामामुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
नोट्रे देमची फेरउभारणी केली जाईल, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.