भिवंडीत पुन्हा अग्नितांडव

मुंबई: भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर येथील जय माता दी कंपाऊंडमधील रंगकामाचे ब्रश बनविणाऱ्या कारखाना आणि गोदामाला आज पहाटे भिषण आग लागली. या आगीवर तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत पाच गोदाम जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गोदामानजीक एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सुरुवातीला आग लागली. ती आग वाढू लागल्यानंतर शेजारच्या जे क्रमांकाच्या इमारतीमधील कबावत ब्रश कंपनीच्या कारखान्याने पेट घेतला. कारखान्यात मोठ्या प्रमाणात रंग आणि थिनर या केमिकलचा साठा असल्याने आगीने मोठया प्रमाणत पेट घेतल. केमिकल्समुळे आग अधिकच भडकली. या आगीमुळे पहिल्या मजल्यावरील पाच गोदामं जळून खाक झाली आहेत.

या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग अधिकच भडकू लागल्याने ठाणे अग्निशमन दलाने देखील एक गाडी घटनास्थळी रवाना केली. तब्बल 8 तास अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.