नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत आगीचे सत्र आजही सुरूच आहे. काल झालेल्या आगीच्या तांडवानंतर आज पहाटे पुन्हा एकदा दोन कारखान्यांमध्ये भीषण आग लागली आहे. दिल्लीतील नरेला औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या दोन कारखान्यांना मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून दोन्ही कारखान्यांमध्ये आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Delhi: Fire fighting operations underway at a shoe factory in Narela Industrial area where a fire broke out earlier today. https://t.co/4CvRz5YYp2 pic.twitter.com/XQ331PDcYv
— ANI (@ANI) December 24, 2019
मंगळवारी पहाटे एका बूट कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे मोठी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग एवढी भीषण होती की त्याचा भडका कारखान्यापर्यंत उडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन इंजिनेच्या 22 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझविण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने आतापर्यंत या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. तर बचाव कार्यात तीन अग्निशामक दलाला किरकोळ भाजले गेले, जे प्रथमोपचारानंतर कामावर परतले आहेत.