धुळे – धुळे शहरातील कपडा मार्केटमध्ये सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पाचकंदील परिसरातील शंकर मार्केटला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/514742106413251
शहरातील पाचकंदील परिसरात असलेल्या शंकर मार्केटमध्ये आग लागली असून या आगीमध्ये कापडांची दुकाने जळाली आहेत. कापड मार्केट असल्यामुळे आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाला असून धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. मार्केटमधील इतर दुकानंही आगीच्या तडाख्यात सापडली आहेत.
आग विझवण्यासाठी महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र जुन्या बाजारपेठेत अरुंद जागा असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अडचणी येत आहे.
दरम्यान, सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जावितहानी झाली नाही. मात्र कापड दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे बघायला मिळाले आहे.