पुणे – बारामतीतील भिगवण रोडवरील क्रोमा सेंटरला भीषण आग लागली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले आहे.
दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे क्रोमा सेंटरला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजत आहे.