दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरच्या ऑपरेशन थिएटरला भीषण आग

दिल्ली – दिल्लीच्या एम्स रूग्णालयातील ट्रामा सेंटरच्या ऑपरेशन थिएटरला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनच्या सहा गाड्या दाखल दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. आगीत कोणीही अडकले नसून रूग्णालयातील रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.