पुणे- राष्ट्रवादीचे नेते ‘अजित पवार’ यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसला भीषण आग लागली आहे. हे फार्महाऊस घोटवडे फाट्याजवळील मुळा नदीवर आहे. रविवारी (दि. 11) संध्याकाळी ही आग लागली असून, आगीने मोठे राैद्र रुप धारण केले होते.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2418519831696902/
दरम्यान, आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आगीत फार्महाऊसचं मोठं नुकसान देखील झालं आहे.