भिवंडीत गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मुंबई – भिवंडीमधील एका गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भिवंडीतील पूर्णा गावातल्या बस स्थानकाजवळील एका गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या आग आटोक्यात आली असली तरी अद्याप पूर्ण आग विझलेली नाही. या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.