आळंदीच्या जुन्या नगरपालिकेला आग

आळंदी – 1869 मध्ये स्थापन झालेली आळंदी नगरपालिकेची जुनी इमारत ही सध्या गोडाऊन म्हणून वापरली जात आहे. शनिवारी (दि. 16) मध्यत्रात्रीनंतर कोणीतरी या इमारतीला आग लावण्याचा प्रकार केला. इमारतीत कोणतेही महत्त्वाची कागदपत्रे नसल्याने फारसे नुकसान झाले नाही, अथवा तेथे कोणी राहत नसल्याने जीवित हानीही झाली नाही. मात्र, मात्र, अज्ञात व्यक्‍ती इमारतीस आग लावून पसार झाला.

आळंदी पालिकेला गेल्या दहा वर्षांत ही तिसरी आग लागली आहे, त्यामुळे कोणीतरी जाणून-बुजून हा प्रकार करीत असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. ऐन कार्तिक वारीच्या आधी ही आग लावण्याचा प्रकार घडला. अग्निशामन दलाच्या वतीने आग त्वरित विझवण्यात आली; मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही, असे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.